तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांचा  प्रचंड ओघ असल्याने मंदीरा  कडे येणारे भवानी रोडवर मंगळवार दि.९ रोजी  अतिक्रमण  हटाव मोहीम राबवल्याने अतिक्रमण केलेल्या व्यापारी वर्गाची चांगली च तारांबळ उडाली .

यात अतिक्रमण करणाऱ्या वीस व्यापारी वर्गाचे साहित्य जप्त करण्यात आले.

नगरपरिषद वतीने सकाळी ११वा.  अतिक्रमण हटाव,मोहीमेस आरंभ झाला,प्रथमता भवानी रोडवरील नंतर भिमनगर येथील अतिक्रमण हटवले नंतर भवानी रोड कुंभार गल्ली ते घाटशिळ वाहनतळ रस्त्यावर असणारे  अतिक्रमण हटाव मोहीम चालु करताच भाविकांचा या रस्त्यावर प्रचंड ओघ असल्याने भाविकांची एकच गर्दी कुंभार गल्लीत झाल्याने येथील अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित करण्यात आली .

या अतिक्रमण हटाव मोहीम साठी पोलिस बंदोबस्त होता या अतिक्रमण हटाव मोहीम साठी स्वच्छता निरक्षक दत्ता सांळुके,  सातपुते गायकवाड,  अनिल पारधीसह न.प. कर्मचारी य आदींने परिश्रम घेतले. 

यापुढे विविध विभागातील अतिक्रमण हटाव मोहीम चालुच राहणार असल्याचि माहीती नगरपरिषद ने दिली.  व्यापारी वर्गाने केलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना चालणे कठीण बनल्याने 

नगरपरिषद वतीने शहरातील प्रमुख भाविकांच्या वर्दळीच्या रस्त्यावर असणारे अतिक्रमणे हटाव मोहीम राबविण्यात आली. 

 
Top