तेर/ प्रतिनिधी

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथे उन्हाळी सुट्टीतही गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संगणक प्रशिक्षण शिबीराची शनिवार दिनांक ६ मे रोजी उत्साहात सांगता झाली. 

 कोरोना या महाभयंकर महामारीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या ग्रामीण भागातील वाडी वस्ती खेडी तांड्यावरील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासह विद्यार्थ्यांना शिक्षणासह शाळेची गोडी लागावी यासाठी तेर ता. धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील शिक्षकवृंदाच्या वतीने शैक्षणिक उपक्रमासह सामाजिक ,सांस्कृतिक, क्रीडासह विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थीही मोठ्या आनंदाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ व अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळी सुट्टीतही शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी साठी संगणक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या संगणक प्रशिक्षण शिबिरात शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी मधील दोनशेच्यावर विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवत संगणकाचे ज्ञान घेतले. यावेळी याच संगणक प्रशिक्षण शिबीराची शनिवार दिनांक ६ मे रोजी मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संगणक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ , अक्षर भारती सेवा इंटरनॅशनल संस्थेचे राज्य समन्वयक संतोष शेळके , सहशिक्षक गोरोबा पाडुळे , शशिकांत देशमुख , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , चंदकांत गिरे , गोरख चौरे , नाईक उषा , मुंढे प्रभावती , शेजाळ वर्षा , नाईक उषा , हलसीकर रोहिणी , लता बंडगर , पांचाळ शकुंतला , गोकुळ ढोबळे , आप्पा कोकरे , विठ्ठल शेळके , विठ्ठल कोळपे , राम देवकते , पांडुरंग ढोबळे , अच्युत पांढरे , खंडू क्षिरगिरे , साहेबराव कदम , विनायक ढोबळे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .यावेळी संगणक प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top