धाराशिव / प्रतिनिधी-
श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय गेल्या दहा वर्षापासून फोटॉन बॅच अंतर्गत नीट व जेईई परीक्षे संदर्भात परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. या फोटॉन
बॅचमध्ये शिकवणारे तज्ञ प्राध्यापक हे कोटा, आकाश, अलेन या नामवंत इन्स्टिट्यूट मधून घेण्यात आले आहेत हे सर्व प्राध्यापक आपल्याकडे पूर्णवेळ उपलब्ध राहून NEET/JEE या परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतात जेईई मेन्स परीक्षेसाठी प्रशालेतून 35 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यातील आठ विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स साठी पात्र ठरले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील यांनी अभिनंदन केले .
फोटोन बॅच साठी तज्ञ मार्गदर्शक, सुसज्य स्टडी मटेरियल, इन्व्हर्टरची सोय अद्यावत ग्रंथालय व स्टडी रूम, बायोमेट्रिक प्रेझेंटी सीसीटीव्ही ,डाऊट सेशन डिजिटल बोर्ड ऑनलाइन टेस्ट सिरीज DPP अशा विविध सुविधा उपलब्ध असून याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे त्यामुळेच जेईई मध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत असे यश प्राप्त होत आहे.
जेईई परीक्षा मध्ये गुणवंत विद्यार्थी
लोमटे राजवीर विठ्ठल98.54%OPEN, घोगरे समर्थ सुग्रीव 96.88%OPEN, )कुंभार व्यंकटेश मोती 92.62%OBC, वायचळ ऐश्वर्या विवेकराज 85.76%OBC, शिंदे सुजित सादू 83.85%SC, बनसोडे आदित्य अशोक 72.77%SC, सुपतगावकर राधा गजानन68.33%SC, ओहाळ हर्षल सहदेव 56.49%SC सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सरचिटणीस माननीय सौ प्रेमाताई सुधीर पाटील ,प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील , प्रशालेचे प्राचार्य साहेबराव देशमुख उपप्राचार्य प्रा.संतोष घार्गे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी हाजगुड फोटॉन बॅचप्रमुख प्रा.अरविंद भगतसर यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.