धाराशिव / प्रतिनिधी-

  टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर व ग्रामपंचायत धारुर यांच्या संयुक्त विद्यमाने सेद्रींय शेतीला चालना देण्याच्या उध्देशाने जिल्हास्तरीय सेद्रींय शेती नोदंणी अभियान व शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन  जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

  तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी हे बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील वाढते शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हा गंभीर विषय आहे, भविष्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रीय शेती पध्दती ही किफायतशीर ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रीयशेती त्याच बरोबर त्याचे प्रमाणीकरण ही करावे यासाठी आम्ही देशातील पहिल्या सेंद्रीय उत्पादक शेतकरी पासपोर्ट काढण्याच्या अभियानाची उस्मानाबाद जिल्ह्यातुन सुरुवात करत असल्याचे  सांगितले.

  सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक   अतुल कुलकर्णी, टाटा संस्थेचे प्रभारी उप संचालक डॉ. बाबासाहेब काझी, रविंद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, प्रांजल शिंदे प्रकल्पसंचालिका, डीआरडीएा आणि उमेद अभियान, उस्मानाबाद  आजीनाथ काशीद, पोलीस निरीक्षक तुळजापूर, मेळावा समन्वयक गणेश चादरे, बालाजी पवार, सरपंच, धारुर, डॉ. विजय जाधव, कृषि विज्ञान केंद्र, तुळजापूर, मिलींद डिबाग तालुका कृषि अधिकारी, तुळजापूर, शोभा कुलकर्णी, माविम, नसीम शेख, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, धनाजी धोतरकरआदी मान्यवर उपस्थित होते.  

 
Top