धाराशिव / प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे अनुदान व शासकीय हरभरा खरेदीचे १०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावे, अन्यथा दोन्ही मागण्याची दखल शासनाकडून गांभीऱ्याने न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी (दि.११) दिलेल्या निवेदनात दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री दुधगावकर यांनी म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेस मान्यता दिलेली असून या योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ६१४३६ लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे यापैकी ४८ हजार ५४८ लाभार्थी शेतकºयांची यादी योजनेच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात दिनांक १० मे २०२३ पर्यंत ४५ हजार २२५ शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिककरण पूर्ण केलेले आहे त्यापैकी ३९ हजार ८८ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये बचत खाते रक्कम जमा झालेली आहे परंतु त्यातील आधार प्रमाणे केलेल्या ६१३७ शेतकऱ्यांची रक्कम आज अखेर जमा झालेली नाही ती रक्कम अंदाजे २० कोटी रुपये एवढी आहे व १४ हजार ८८८ शेतकऱ्यांची यादी आॅनलाईन केलेली असून त्यांची यादी आधार प्रमाणे की करण करून मुंबई येथून येणे बाकी आहे तरी १४ हजार ८८८ शेतकऱ्यांची आधार प्रमाणे की करण यादी मंजूर करून ६१३७ नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अंदाजे २० कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान येथे आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या नावे जमा करण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर दोन लाख क्विंटल हरभरा खरेदी झालेला असून त्यापैकी ८७ हजार क्विंटल हरभऱ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या नावे जमा झालेले आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांचे जवळपास १०० कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात त्यांच्या खाते नावे जमा करण्यात यावेत, या दोन्ही मागण्यांची दखल शासनाकडून गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.


 
Top