तुळजापूर प्रतिनीधी :-  तुळजाभवानी मंदिरात अशोभोनीय    कपडे घालुन   मंदिरात  देवीदर्शनार्थ येणार्‍यांना प्रवेश बंदी गुरुवार दि. 18 पासुन  करण्यात आले आहे.  मंदीर संस्थानने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत धार्मिक वृत्ती च्या भाविकांन सह पुजारीवृदांनी केले आहे. त्या नंतर मात्र मंदिरसमीतीने घेतलेल्या निर्णयावर माध्यमात चर्चा झाल्यानंतर समीतीने हा निर्णय तात्काळ मागे घेतला .गुरुवार दि. 18 पासुन  श्री. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणार्‍यांना नो एन्ट्रीअर्थात प्रवेश बंदी असणार आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानने मंदीर परिसरात याबाबतचे फलक लावले आहेत. अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भान ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहन केले आहे 




निर्णय मागे

मंदिर समीतीच्या निर्णया नंतर माध्यमात यावर चर्चा झाल्या नंतर मंदिर प्रशासनाने निर्णय तात्काळ मागे घेतला त्या सर्ंदभातील प्रेसनोट माध्यमाना पाठवण्यात आले.

 
Top