तुळजापूर प्रतिनीधी :-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत चालली आहे. या वाढत्या तापमानाचा मोठा परिणाम जनजीवन विस्कळीत होत आहे.सोमवारी दि१५रोजी  तापमान ४०.८अंशावर पोहचले होते पुढील पंधरा दिवसात या तापमानात वाढ होवुन ४४अंशापर्यत पोहचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या आग ओकणारा सूर्य आणि घामानं डबडबणारं सर्वांग यामुळे तुळजापूरकरांन सह देवीदर्शनार्थ येणारे भाविक  वैतागले आहेत. वाढत्या तापमान पार्श्वभूमीवर भाविक पहाटे देवधर्म उरकुन घेत आहेत तर व्यापारी वर्गाने  भाविक  गिऱ्हाईक साठी दुकांना समोर पडदे मारुन सावली केली आहे व दुकांनासमोर मँट अंथरले आहेत  ग्रामीण भागात शेतीचे श्रमाचे कामे पहाटे व सांयकाळी केली जात  आहेत दुपारी  कष्टाची कामे करणे टाळले जात आहे. असाह्य उष्णते पासुन सुटका मिळावी म्हणून लोक टोप्या गमजे गाँगलचा मोठ्या प्रमाणात  वापर करीत आहेत तर दुपारी उष्ण तापमानापासुन सुटके साडीथंडपेय दुकांनावर गर्दी करीत आहेत  मधल्या काळात घटलेल्या तापमानानं पुन्हा उसळी घेत चार दिवसांपासून चाळीशी पार करीत सोमवारी चक्क ४०.८ अं. से. हे यंदाच्या मोसमातील सर्वोच्च तापमान नोंदले आहे.  मे महिना आणखी पंधरवड्यावर आहे. ही तीव्रता अशीच राहुन तापमान ४४अंश सेल्सियस वर पोहचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  मार्च ते मे या तीन महिन्यांत ही तीव्रता सर्वाधिक जाणवते.  गेल्या महिन्यात एप्रिलमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तापमानाचा पारा काही अपवाद वगळता चाळिशीच्या पुढे राहिला. मधल्या काळात वातावरणातील बदल आणि ढगाळ वातावरणात पावसाच्या सरी यामुळे ३६ ते ३९च्या आसपास तापमान होते. मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात ही स्थिती कायम होती. मात्र, १० मेनंतर पुन्हा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आणि पारा चाळीस अंशावर गेला.

 सोमवारी वारी थेट ४४.८ अंशांवर

पोहोचल्याने तुळजापूर करांना उष्म्याचा दाह सहन करावा लागला.पावसाळा सुरू व्हायला आणखी पंधरवडा उरला आहे. यामुळे धग अशीच कायम राहिली तर टेम्परेचर ४४ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 तापमान

चाळिशीच्या वर गेल्याने ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील रस्त्यावर असणारी वर्दळ घटली आहे.  महत्वाचे काम असेल तर घराच्या बाहेर  लोक पडण आहेत. बाहेर जाताना टोपी, छत्रीचा वापर करित आहे  .  उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शेतीच्या तसेच बांधकाम कामांना काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 
Top