धाराशिव / प्रतिनिधी-
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना गणेश नगर धाराशिवयेथे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.
पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये गोरगरीब जनतेला मोफत औषध उपचार मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून नवीन सहा रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी येत्या काही दिवसांमध्ये नवीन 9 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येतील.
यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, जि.प माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे, आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे 4 लाख 39 महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर 70 टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदुढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत. औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल.