धाराशिव / प्रतिनिधी-

  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव तालुक्यातील खेड, कोंड येथे छापा टाकून लाखो रूपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला. संबंधितावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशावंत जाधव यांना धाराशिव तालुक्यातील खेड, कोंड येथे गुटखा साठा असल्याची माहिती मिळाली होती. यावरून खेड, ता. धाराशिव येथील सुहाना ट्रेडर्स दुकानामध्ये छापा टाकला. त्यावेळी पथकाने मुनीर बशीर तांबोळी रा.  खेड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांने उडवाउडवीची उत्‌तरे दिल्याने पथकाने सदर दुकानाची पाहणी केली. त्यामध्ये रत्ना बादशाहा गुटख्याचे 700 पुडे, गोवा गुटख्याचे 67 पुडे, राजनिवास कंपनीच्या गुटख्याचे 24 पुडे, विमल गुटख्याचे 43 पुडे,  सुगंधीत तंबाखू 61 पुडे, जाफराणी जर्दा सुगंधीत तंबाखूचे 120 पुडे, सुगंधीत तबांखु 109 पुडे, लाल पिवळ्या रंगाचे पॉकेट मध्ये 11 पुडे असा एकुण 2 लाख 308 रूपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सुहाना ट्रेडर्समध्ये ठेवलेला गुटखा साठा मिळून आल्याने महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटख्याच्या पुड्या जप्त करून पंचनामा केला. गुटखा विक्री करणारा मुनीर बशीर तांबोळी यांचेविरुध्द  भा.दं.सं. कलम-  272, 273, 188, 328 अंतर्गत गुरंन 180/2023 असा गुन्हा ढोकी पोलीस ठाणे येथे नोंदवला आहे.

पोलिसांनी कोंड, ता. धाराशिव येथील राम समाधान परीट यांच्या पान टपरीमध्ये 5 मे रोजी छापा टाकला. त्यांच्या आदित्य पान शॉप येथे 38 हजार 620 रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा जप्त करुन राम परीट यांच्या विरोधात   भा.द. सं. कलम- 328, 188, 272, 273  अंतर्गत ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  नवनित कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यशवंत जाधव, ढोकी पोलीस ठाणे चे प्रभारी सपोनि जगदिश राऊत, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार, उपनिरीक्षक श्री. ओहोळ, पोलीस हावलदार जानराव, पठाण, पोलीस नाईक जाधवर, आरसेवाड, महिला पोलीस अंमलदार- टेळे, चालक पोलीस हावलदार गायकवाड, मांगणाळे यांच्या पथकाने केली.

 
Top