धाराशिव:- लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. 10 एप्रिल 2023 रोजी पोलीस चौकी आरक्षित असलेले जागेत समाज मंदिर बांधकाम करण्याचा निर्णय रद्द करून तात्काळ बांधकाम स्थगिती करण्यात यावी वादग्रस्त समाज मंदिर व पोलीस चौकी ही अगदी समोरासमोर असल्याने गावात प्रवेश करण्याचा मुख्य रस्त्यावर आहेत यापूर्वीप्रमाणे गावात दोन्ही समाजाचा वाद होण्याची शक्यता न करता येत नाही. अगोदर बौद्ध समाजाच्या मराठा समाजाच्या नागरिकांवर विनाकारण 18 सिटी सारखे गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे गावात दलित समाज दहशत पसरवून गावातील मराठा व इतर समाजावर अन्याय करीत आहेत व 18 एप्रिल 2022 रोजच्या आदेशावरील समितीने अनु.जाती व नवबौध्द हक्कासाठी समाज मंदिर उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर अहवाल सादर केला होता परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दहा एप्रिल 2023 रोजी सदर अहवालाचा विचार न करता निर्णय दिला हा निर्णय गावातील जनतेच्या कोणताही विचार न ऐकता सदर निकाल दिला आहे तसेच सदर लेआउट मध्ये 10 एप्रिल 2023 रोजीच्या निर्णया हा जनतेच्या कोणत्याही विचार म्हणणे न ऐकता सदर निकाल दिला आहे. तसेच 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी या सह विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 मे पासून कानेगाव येथील ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहेत या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे

 
Top