धाराशिव (प्रतिनिधी) :- डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शुक्रवार दि. मे  रोजी खेड, ता.धाराशिव येथे सकाळी : ते : या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात खेड व परिसरातील सर्व वयोगटातील  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन ड नितीन लोमटे यांच्या हस्ते झाले या वेळी प्रमुख पाहुने महादव बापु गवाड, ज्ञानोबा गरड, पंढरी गरड, सुखदव गरड, अर्जुन गरड, तुळशीदास गवाड, बुबा लोमटे, काका लोमटे, सचिन वीर, बाळासाहेब गवाड, राजेंद्र गरड,  लिंबराज लोमटे, विलास लोमटे, दिनकर गरड, विठ्ठल लोमटे,  विठ्ठल गरड,किशोर  लोमटे, अंकुश गवाड, शहाजी लोमटे, भाऊसाहेब गरड, रंजीत दंगटि, पवन टिकले,अक्षय शिंदे उस्मान शेख, विनोद गरड इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ. अजित निळे, डॉ.अतुल जमदाडे, डॉ.विजय बोराडे, डॉ. सचिन शिंदे, डॉ. प्रज्वल उकालकर, डॉ. अभिजित यादव यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे आमिन सय्यद, विनोद ओव्हाळ, संदिप खोचरे, पवन वाघमारे, रवी शिंदे व उपकेंद्राच्या आशा कार्यकर्त्या आशा घुले, शितल गरड यांनी परीश्रम घेतले.



 
Top