धाराशिव (प्रतिनिधी) :-  लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी 18 मे 2023 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण करत असलेल्या काही ग्रामस्थांची खालवली असल्याची माहिती व सोमवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रसार माध्यमाची बोलताना उपोषणकर्त्यांनी दिली आहे 10 एप्रिल 2023 रोजी पोलीस चौकी आरक्षित असलेले जागेत समाज मंदिर बांधकाम करण्याचा निर्णय रद्द करून तात्काळ बांधकाम स्थगिती करण्यात यावी वादग्रस्त समाज मंदिर व पोलीस चौकी ही अगदी समोरासमोर असल्याने गावात प्रवेश करण्याचा मुख्य रस्त्यावर आहेत यापूर्वीप्रमाणे गावात दोन्ही समाजाचा वाद होण्याची शक्यता न करता येत नाही. अगोदर बौद्ध समाजाच्या मराठा समाजाच्या नागरिकांवर विनाकारण ट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे गावात दलित समाज दहशत पसरवून गावातील मराठा व इतर समाजावर अन्याय करीत आहेत व 18 एप्रिल 2022 रोजच्या आदेशावरील समितीने अनु.जाती व नवबौध्द हक्कासाठी समाज मंदिर उभा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर अहवाल सादर केला होता परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी दहा एप्रिल 2023 रोजी सदर अहवालाचा विचार न करता निर्णय दिला हा निर्णय गावातील जनतेच्या कोणताही विचार न ऐकता सदर निकाल दिला आहे तसेच सदर लेआउट मध्ये 10 एप्रिल 2023 रोजीच्या निर्णया हा जनतेच्या कोणत्याही विचार म्हणणे न ऐकता सदर निकाल दिला आहे. तसेच 19 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी या सह विविध मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 18 मे पासून कानेगाव येथील ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहेत 20 मे रोजी उपोषणाचा 3 या दिवस होता.उपोषण स्थळापासून पाचशे मीटर पर्यंत दूर दूर महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने उपोषणामध्ये बसलेल्या महिलांनी गावाकडे परतल्या आहेत अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे प्रशासनाला कळवून देखील प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छताची व्यवस्था केली नसल्याची खंत देखील उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


 
Top