धाराशिव / प्रतिनिधी-

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पोलीस पथकाच्या तीन टीमने येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोराखळी येथील सोनार यांचे शेत व धाराशिव साखर कारखाना परिसरात छापे मारून गावठी दारू निर्मितीचे अड्डे उद्धवस्त केले. ही कारवाई 25 एप्रिल रोजी करण्यात आली.

चोराखळी व धाराशिव कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारु विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी यांच्या आदेशावरुन विशेष पोलीस पथक येरमाळा ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले. चोराखळी गावात अवैध दारु विक्रीवर छापे टाकण्यात आले. प्रोबेशनरी डीवायएसपी गीतांजली दुधाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक मैंदाड, पिंक पथक पोलीस हावलदार तुगावकर, पठाण, पोलीस नाईक पाटील, राऊत, भांगे, ठाकुर, महिला पोलीस अमंलदार आदटराव, लिमकर, गाढवे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी गंगुबाई उध्दव काळे यांचे घरी चोराखळी येथे छापा टाकला. यावेळी 45 लिटर गावठी हातभट्टीची आंबट उग्र वास येत असलेली दारु अंदाजे 2 हजार 700 रूपये किंमतीची मिळून आल्याने ती जागीच जप्त करण्यात आली. तसेच धाराशिव साखर कारखाना येथे छापा टाकला. लता बालाजी काळे व बालाजी भाऊ काळे यांचे राहते घरी 8 हजार 365 रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 33 सिलबंद बाटल्या मिळून आल्या. सदर माल जप्त करुन आरोपीस ताब्यात घेतले. तसेच  चोराखळी शिवारात गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी भट्टया बनवण्यात आलेल्या होत्या. त्या ठिकाणी छापा टाकला. 200 लिटरचे दोन बॅरेल अंदाजे 20 हजार रूपये किंमतीचे व गावठी हाभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन प्रोबेशनरी डीवायएसपी गीतांजली दुधाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे वाचक, महिला पोलीस उपनिरीक्षक मैंदाड, पिंक पथक पोलीस हालदार- तुगावकर, पठाण, पोलीस नाईक, पाटील, राऊत, भांगे, ठाकुर, महिला पोलीस अमंलदार आदटराव, लिमकर, गाढवे यांच्या पथकाने केली आहे.

 
Top