तुळजापूर/ प्रतिनिधी-  

 श्रीतुळजाभवानी मातेचा चैत्री  पोर्णिमा यात्रा पार्श्वभूमीवर बुधवार दि ५रोजी देविदर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदोच्या गजराने तुळजाई नगरी गर्जुन गेली आहे.

चैञी पोर्णिमा पार्श्वभूमीवर मंगळवार पासुन  देविजींचा दर्शनासाठी मंदीरात  घाटशिळ रोड वाहनतळातुन बिडकर पायऱ्या वरुन थेट दर्शन मंडपात  सोडण्यात  येत आहे  येणा-या भाविकांना   स्नानासाठी घाटशिळ वाहनतळा जवळ असलेले  भवानीतिर्थकुंड उघडले असुन तिथे भाविक  स्नान करुन    दर्शनार्थ जात आहेत

चैत्री पोर्णिमा साठी  आलेले भाविक भवानी तिर्थकुंडात  स्नान करताच लगेच देवीदर्शनार्थ रांगेत जात आहेत.  सध्या भाविक   देविजींच्या पालखी सह हलग्याच्या कडकडटात आराधी गाणी म्हणत भक्ती रसात  दंग झालेले आहेत. भाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून  पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

 दरम्यान, यात्रेला आलेला भाविक श्री श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर लगेचच येरमाळ्याला येडाईचा दर्शनार्थ रवाना होत आहेत .

 

 
Top