धाराशिव / प्रतिनिधी-               

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची जयंती उत्सवात साजरी करण्यासाठी आश्रम शाळा कर्मचारी व शिक्षक यांचा मार्च 2023 चा पगार त्वरित करण्यात मागणी  शिंगोली  आश्रम शाळा    व कर्मचारी प्रतिनिधी  सतीश कुंभार यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी आहे. ही जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी माहे मार्च 2023 चा पगार त्वरित होणे अत्यंत आवश्यक कारण पगारांमधील गृह कर्ज, पतसंस्था कर्ज, एलआयसी हप्ता, कटत असल्यामुळे माहे मार्च पगार कर्मचाऱ्यांना त्वरित मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही पगारी झालीतरच  आम्हाला जयंती उत्साहात करता येईल. तरी  माहे मार्च 2023 चा पगार होणे बाबत आदेशित करून करून शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी  शिंगोली  आश्रम शाळा, आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी प्रतिनिधी     सतीश कुंभार यांनी केली आहे. 


 
Top