धाराशिव/प्रतिनिधी - 

धाराशिव नगर पालिकेचे निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर   गुन्हे दाखल आहेत. दोन प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी येलगट्टे यांना नाशिक जिल्ह्यात मंगळवारी  स्थानिक गुन्हा शाखेने  अटक केली. त्यानंतर त्यांना धाराशिवमध्ये आणण्यात येऊन आज ( बुधवारी ) जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

 प्रसाद रंगनाथ पाटील आणि पूजा प्रसाद पाटील यांना दिलेल्या बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात सर्वप्रथम अटक दाखवण्यात आली असून, याप्रकरणी न्यायालयात उभे करण्यात आले असता, एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. पोलिसांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागितली असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी मान्य केली.

 
Top