धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव शहरातील प्रसिध्द विधीज्ञ अँड मारुती निवृत्ती रोंगे (75) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी (दि30) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले.

 अँड.रोंगे बापू  यांना काही महिन्यापुर्वी  अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान झाले होते.त्यावर उपचारही सुरु होते परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतू   उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.अँड  रोंगें बापू यांनी बार्शी तालुक्यात अस्तित्वात असलेल्या भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष पदही भूषवले होते त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्ष काम केले.माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचे ते  विश्वासु सहकारी होते.त्यांचा स्वभाव अतिशय चांगला मनमिळावू सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा होता त्यांच्या पार्थिवावर  गुरुवारी रात्री बरमगाव (बु) ता. धाराशिव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार  करण्यात आले.

 यावेळी धाराशिव, रुईभर, बरमगाव परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांची  मोठ्या संख्येने उपस्थिती  होती. त्यांच्या निधनामुळे धाराशिव, रुईभर, बरमगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top