तेर / प्रतिनिधी-

किशोर वयीन मुलींनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्त्री रोग तज्ञ  डॉ.एस.एम.धोंगडे यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथील अ़गणवाडी क्रमांक २०७ मध्ये किशोर वयीन मुलींसाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात डॉ.धोंगडे बोलत होते.

अध्यक्षस्थानी अंगणवाडी पर्यवेक्षिका मनिषा पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नरहरी बडवे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन जोशीला लोमटे यांनी केले.यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती लोमटे लिलावती,अर्चना सोनवणे,रोहीणी कांबळे,दवन दैवशाला, सखुबाई राऊत ,प्रभावती वाघमारे ,लतिका पेठे,मीनाताई बंडगर ,सरोजा वाघमारे,अर्चना कोकरे,अश्विनी खंदारे, बागवान रईसा मदतनीस मिरा खरात, खंडागळे सरस्वती, सुमन कावळे, अस्मिता डोलारे,काशिबाई रसाळ,शेंवता सलगर ,सखुबाई पांढरे, आशा स्वयंसेविका कविता आंधळे उपस्थित होत्या.


 
Top