धाराशिव / प्रतिनिधी- 

 छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुळजापूचे श्री त्रिंबक सिंदफळकर यांची बीड,लातूर, धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. 

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  ा विजयराज  शिंदे व प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब क्षिरसागर तसेच राष्ट्रीय महासचिव  मल्लिकार्जुन गुरव यांच्या हस्ते सिंदफळकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष  भालचंद्रराव धारूरकर, सर्वश्री अंबादासराव औटी, महेश मोटे, रवी तिर्थकर, श्रीनिवास पाटील, समाधान बेद्रे, प्रदीप मोकाशे, श्रीमती अनीताताई पाटील, लातूर जिल्हाध्यक्ष संजय घुगे बीड जिल्हाध्यक्ष  राजेश गवळी तसेच धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्य़ातील पदाधिकारी व गुरव समाज बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.


 
Top