धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन शनिवार दि.१५ एप्रिल २०२३ रोजी श्री. रेणूका देवी यात्रे निमीत्त अंबेजवळगे, ता.धाराशिव येथे   करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात अंबेजवळगे व परिसरातील सर्व वयोगटातील ७०० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा दुध संघाचे मा. चेअरमन नवनाथ राऊत, सरपंच वैषणवी राऊत, मा.सरपंच राजेसाहेब देशमुख, उपसरपंच लक्ष्मण जाधव, मा.ग्रा.सदस्य बालाजी जाधव, विनोद वायकुळे, लक्ष्मण वाघ, हनुमंत बिरंजेइत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ.जन्मय वाला, डॉ. ज्वंजल माधव, डॉ.शिमोनी पंडीत, डॉ.जय जैन, डॉ.बोराणी चटर्जी यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे श्री. अमीन सय्यद, विनोद ओव्हळ,  पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, व अंबेजवळगे येथील आशा कार्यकर्त्या यांनी परीश्रम घेतले.

 
Top