धाराशिव / प्रतिनिधी-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डी एस ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या त्रिमूर्तींना जयंती समारोह समितीच्या वतीने मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मिलिंद पाटील शिरढोण येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिल्याबद्दल नितीन पाटील यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधिज्ञ बारचे अध्यक्ष ॲड.सुधाकर मुंडे, भाऊसाहेब उंबरे, प्रकाश जगताप,ॲड.राम गरड, कॅप्टन बुबासाहेब बागल, संपतराव डोके, पत्रकार धनंजय रणदिवे, चंद्रसेन देशमुख, संतोष जाधव,जयंत पाटील, ॲड.अनिल काळे, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, नानासाहेब निंबाळकर,डॉ.दिग्गज दापके,दिलीप महाजन, विजय भन्साळी,मिलींद कोकाटे, राजाभाऊ माळी, ॲड. उषा साखरे, ॲड. ज्योती बडेकर, किरणताई निंबाळकर, आबासाहेब खोत, शामभाऊ कुलकर्णी, पंकज काटे, (लातूर ) बाळासाहेब वाघमारे ( सोलापूर )डी एन कोळी, रेखाताई लोमटे, ॲड. बयाजी साबणे, राजेंद्र अत्रे, लक्ष्मण माने,रवि कारे, बालाजी पवार, संजय पवार, सिद्धार्थ बनसोडे, महादेव लिंगे, सागर चव्हाण, सुरज शहापालक, प्रसेंजीत शिंगाडे,यशवंत शिंगाडे, दिग्वीजय शिंगाडे, महेश शिंगाडे, प्रशांत कांबळे, सारिपुत शिंगाडे,यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते
जिल्हाधिकारी सचिन ओबासे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता श्रीमती अस्मिता ओंबासे यांच्या उपस्थितीत जयंती मिरवणुकीला प्रारंभ झाला. डी एस ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यावेळी बोलताना म्हणाले की, गेल्या 27 वर्षापासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुक व विविध सामाजिक उपक्रम या माध्यमातून साजरी केली जाते यामध्ये सर्व धर्मीय नागरिकांचा मोठा सहभाग हेच या जयंतीचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्याचे तीन प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे तीनही प्रमुख अधिकारी अत्यंत जबाबदारीने जिल्ह्याचे नेतृत्व सक्षमपनाने सांभाळत आहेत.
जयंती समारोह समितीच्या वतीने या तीनही अधिकाऱ्यांचा मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला ही मिरवणूक शहरातील त्रिशरण चौक,सावरकर चौक,काळा मारुती मंदिरापासून मोठ्या उत्साहात निघाली. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्यांचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. वाद्याच्या तालावर जयंती समारोह समितीचे अध्यक्ष राजाभाऊ बागल जयंती समितीचे प्रमुख मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी ठेका धरला. कार्याध्यक्ष रावसाहेब शिंगाडे उपाध्यक्ष भावेश काशीद योगेश वाघमारे कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे सचिव नितेश जानराव आदींची यावेळी उपस्थिती होती.
सर्व धर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत निघालेली जयंती मिरवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपासून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अभिवादन करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला
समितीचे प्रमुख मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्दल विशेष आभार मानले.