धाराशिव / प्रतिनिधी-
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त धाराशिव शहरातील डी आय सी रोड जवळील महात्मा बसवेश्वर चौक येथे शिवा मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर मोहत्सव समिती धाराशिव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पुजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, धाराशिव तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक सोमनाथ गुरव,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,प्रविण कोकाटे, नितिन शेरखाने,लक्ष्मण माने,मुकेश नायगावकर, मार्गदर्शक सुनिल शेरखाने,जयंतीचे अध्यक्ष महेश उपासे, उपाध्यक्ष विनोद कानवले,सचिव नितीन लगदिवे, कार्याध्यक्ष समाधान भोरे,यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी रूषिकेश चपणे,सयाजी राजेनिंबाळकर, किशोर साळुंखे,संजय लगदिवे,सुरज सगरे,किशोर लगदिवे,बापु माळी,श्रीराम मुंबरे,सचिन स्वामी,किरण शेटे यांच्यासह बसव प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.