'नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे असणाऱ्या श्री हनुमान मंदिरात दि.६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे.

       सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र रामतीर्थ येथील श्री हनुमान मंदिरात दि.६ एप्रिल रोजी रघुवीर प्रसाद जोशी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्रीक्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. दि.६ एप्रिल रोजी सकाळी ७ वा. श्री हनुमान अभिषेक, सकाळी ८ ते ९.३० श्री हनुमान शृंगार, सकाळी सकाळी १०.३० वा. महाआरती आणि दुपारी १२ ते ४ भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

         गेल्या अनेक वर्षानंतर यावर्षी गुरुवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आलेला आहे. गुरुवार हा वार जगनियंता भगवान श्री विष्णुदेव यांचा आहे.या दिवशी आपण जे कांही श्री हनुमंताला अर्पण करतो ते भगवान विष्णु यांना अर्पण होते. त्याचबरोबर नवं ग्रहांच संचलन जग नियंता श्री भगवान विष्णु करत असतात. त्यामुळे यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सवारोजी ९ नाणे,९ हळकुंड, पिवळ्या धाग्यात एकत्र बांधुन पिवळ्या वस्त्रात बांधुन त्यासोबत ५ पिवळी फुले व ५ केळी प्रत्येक भाविकांने श्री हनुमानाला अर्पण करावे असे आवाहन महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी केले आहे. यामुळे भाविकांच्या जीवनातील गृहदोष दुर होऊन त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येणार असल्याचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांनी म्हटले आहे.

        श्रीक्षेत्र रामतीर्थ येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top