धाराशिव / प्रतिनिधी-

पोलीस जिल्हा पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने  अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस  पथक कोंड गावात दाखल झाले दरम्यान गावात अवैद्द दारु विक्री करणाऱ्या ठिकाणावर जाऊन धाड मारली , हे पथक गावात  दाखल होताच अवैद्द धंदेवाल्यांनी पोबारा केला .दारु विक्री होणाऱ्या सर्व ठिकाणी जाऊन कसून चौकशी केली .जर यापुढे दारु विक्री केली तर पोलीस कारवाई करणार असल्याची तंबी दिली त्या नंतर कोंड येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच ,उपसरपंच , सदस्य व ग्रामस्थ  महिलांची बैठक घेतली व याबाबत चर्चा करुन पुढील कारवाईचे नियोजन करण्यात आले. जर कोणी गावात दारु , मटका , गुटखा ,जुगार असे अवैद्द धंदे करत असतील तर त्याबाबत पिंक पथकाला गोपनिय माहिती द्यावी असे आवाहन पिंक पथकाच्या पोलीस उप निरिक्षक देवकन्या मैंदाड यांनी उपस्थीत महिलांना केले आहे.

 कोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे त्या ठिकाणी शेकडो महिला  आल्या होत्या त्यांनाही त्या ठिकाणी जाऊन महिला सुरक्षा संदर्भाने कायद्याची माहीती , नविन डायल ११२ क्र. प्रणाली बाबत माहिती , भरोसा सेलच्या कामकाजाबाबत माहिती , सायबर क्राईम व घ्यावयाची दक्षता , बाल गुन्हेगारी , पिंक पथकाच्या कामाबद्दल माहिती दिली तसेच  महिलांची  छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची गय केली जाणार नाही अशी ग्वाही देण्यात आली तसेच निराधार , विधवा महिलांना तसेच गावातील सर्व महिलांna, बचत गट , अध्यक्ष , सदस्या या सर्व महिलांचा एक आँटसप ग्रुप बनवण्यात आला आहे .त्या ग्रुपवर टवाळखोरांची नावे , अवैद्द व्यवसाय करणाऱ्याची नावे , गाडीवरुन कट मारुन महिलांची छेड काढणार्या टवाळखोरांच्या गाड्याँचे नंबर ग्रुपवर टाकल्यावर त्या टवाळखोरांवर आता मोठी कारवाई होणार आहे.सदर ग्रुपवर निराधार विधवा अपंग या महिलां माहिती घेऊन त्यांना वेगवेगळे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वताचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सहकार्य करयाची तजबीज केली आहे . 

हि कारवाई दि.१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास कोंड गावामध्ये करण्यात आली.

या विशेष पोलीस पथकामध्ये पोलीस उप विभागीय अधिकारी गितांजली दुधाने , सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल पवार ,  महिला पोलीस उप निरिक्षक देवकन्या मैंदाड , यांच्या सोबत पोलीस आमलदार गोविंद पडवळ वैशाली जाधव ,सुरेश राऊत , उदय पवार , यांचा विशेष पोलीस पथकामध्ये समावेश होता. गेल्या महिन्यात विशेष पोलीस महानिरीक्षक km m प्रसन्ना यांनी केलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होत असल्याच पहायला मिळत आहे. उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात तळागाळातील लोकांपर्यत पोहचून त्यांना सर्व बाजुंनी आधार देऊन होणाऱ्या त्रासापासू संरक्षण देण्याचा वसा घेत आसल्याचे दिसत आहे.

 
Top