धाराशिव / प्रतिनिधी-

रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इ.12 वी विद्यार्थ्यांचा  शिक्षक -पालक सहविचार सभा  प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आले.

  यावेळी पालक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख साहेबांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेनी शिक्षणाची शिदोरी महाराष्ट्र भर घरोघरी पोचविण्याचा कार्य केल. हेच कार्य आज आमचं महाविद्यालय करीत आहे. प्रत्येक पालकाने  आपल्या पाल्यच्या  सर्वांगीण विकाससाठी प्रयत्न केला पाहिजे.हे केवळ शिक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे. सहविचार सभेचे अध्यक्ष श्री. नानसाहेब पाटील अध्यक्षीय समारोप प्रसंगी पालकाने जागरूक राहून पाल्यच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. पालकाने व पाल्यमध्ये संवाद असणे आवश्यक आहे.                                                  

सभेचे प्रास्ताविक उप प्राचार्य प्रा. बबन सूर्यवंशी यांनी वार्षिक नियोजन व आढावा सादर केला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान या विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सहविचार सभेचे सूत्रसंचलन डॉ. वैभव आगळे व आभार श्री समीर शेख यांनी केले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top