धाराशिव / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित , रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि दैनिक लोकमत व बंसल क्लासेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयातील 150 विद्यार्थी उपस्थित होते.

    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे श्री प्रदीप मांढरे,ईश्वर पुजारी, मंगेश मुळे त्याचबरोबर बन्सल क्लासेसचे अतुल अजमेरा,आकाश गजभारे आणि दिलीप सूर्यवंशी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. डी एम शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले तर आभार करिअर कट्टा उपक्रमाचे समन्वयक डॉ.डी वाय साखरे यांनी मानले.     सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top