धाराशिव / प्रतिनिधी-

 आपला महाराष्ट्र प्रगत, बलशाली बनण्यासाठी सर्वानी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श ठेवून समाजासाठी कार्य केले पाहिजे, असे विचार जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन माळी यांनी मांडले.  

शिंगोली आश्रम शाळेमध्ये क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन माळी, कार्यक्रमाचे प्रमुख शिंदे कुमंत, मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली, यांनी प्रतिमेचे पूजन केले.  यावेळी माळी बोलत होते. 

या कार्यक्रमासाठी  शिक्षक, पाटील रत्नाकर, बर्दापुरे सूर्यकांत, जाधव चंद्रकांत, पडवळ खंडू, दीपक खबोले, कैलाश शानिमे, मल्लिनाथ खोंदे, मदनकुमार आमदापुरे, सतीश कुंभार, कांबळे मॅडम, श्रद्धा सूर्यवंशी मॅडम, कर्मचारी बबन राठोड, गोविंद बनसोडे, वसंत भिसे, रेवा चव्हाण, अमोल जगताप, मस्के मामा इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिन राठोड सर यांनी मानले.

 
Top