तुलजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात  पार पडला, दोन वर्षाच्या खंडानंतर झालेल्या यात्रा महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह, कुस्ती स्पर्धा,सांस्कृतिक महोत्सव, रक्तदान शिबिर यासह पालखी मिरवणूक ,ऐतिहासिक पौराणिक सोंगे  असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, गुरुवार (दि.६)रोजी सकाळपासूनच ग्रामस्थांची शंभू महादेव दर्शनासाठी गर्दी केली होती ,यावेळी मंदिर परिसरात शंभूमहादेव प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते ,सायंकाळी ६ वाजता निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीत विविध सोंगे साकारण्यात  आली होती ,यामध्ये पोतराज, शंकर-पार्वती ,गणपती,राम-सीता, बजरंग बली हनुमान, असे सोंगे येथील कलाकारांनी साकारले होते,पालखीसमोर मेडसिंगा वारकरी संस्थान च्या बाल वारकऱ्यांनी लक्षवेधी टाळ वादन केले, यात्रा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शंभूमहादेव प्रतिष्ठानचे  हनुमंत गाभणे , रमेश काडगावकर,  चंद्रकांत गाभणे, ओंकार काडगावकर ,अमर कानवले ,दादाराव लगदिवे, नागेश अक्कलकोटे ,राहुल कानवले, भगवान लिंगफोडे, नागेश काडगावकर, राजशेखर काडगावकर ,महादेव गाभणे ,बालाजी फंड, एकनाथ अक्कलकोटे ,राहुल तोडकरी ,सुरज ढेकणे, दादासाहेब काडगावकर , केदार तोडकरी  , योगेश काडगावकर, प्रवीण तोडकरी, दादासाहेब काडगावकर ,अनिल गाभणे, किरण काडगावकर, महादेव गाभणे, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर कुंभार, ओंकार हूरडे, सुरज अक्कलकोटे, शिवानंद काडगावकर, लक्ष्मण गाभणे, यांच्यासह शंभू महादेव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ,समस्त ग्रामस्थ ,भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले,

 पैलवान शरण काडगावकर शंभू महादेव केसरीचा मानकरी.

  शंभू महादेव यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्ती स्पर्धा  दोन दशकापासून बंद झाल्या होत्या ,परंतु  कुस्त्यांचा आखाडा मागील वर्षापासून शंभू महादेव प्रतिष्ठानने सुरू केला, शुक्रवार (दि.७) रोजी सायं५वाजता शंभू महादेव मंदिराजवळील डोके मळ्यात भव्य कुस्त्याचे  मैदान आयोजित करण्यात आले होते, या कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होण्याअगोदर मारुती मंदिरात  नारळ वाढून ढोल-ताशांच्या गजरात मल्लांची गावातून मिरवणूक काढून मैदानात प्रवेश केला,पाचशे ते हजार रुपये बक्षीस स्वरूपाच्या असंख्य कुस्त्या होऊन ,शेवटची कुस्ती ५ हजारांची झाली यात पै. शरण काडगावकर याने बाजी मारली ,या कुस्ती मैदानात पंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन पै.हरिभाऊ मगर ,पै.रामहरी गुंड, पै. नबीलाल शेख, पै. विनायक करंडे पै. रामाप्पा भडंगे यांनी काम पाहिले,

   

रक्तदान शिबिराला प्रतिसाद ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

शंभू महादेव यात्रेनिमित्त शंभू महादेव प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांनी शुक्रवार (दि.८) रोजी डॉ. हेडगेवार रक्तपेढी संस्था सोलापूर यांच्या माध्यमातून पावणारा गणपती मंदिरात रक्तदान शिबिर राबवले, या रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या प्रतिसाद दिला , रक्तदान शिबिरात तब्बल ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्त संकलन डॉ. हेडगेवार रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी सुनील हरहरे , डॉ. सुशील वाघमारे ,परिचारिका श्रीमती रूपाली लोंढे ,श्रीमती सौख्या देसाई, मदतनीस राहुल मस्के ,अनिल जांभळे, मोहन करे यांनी केले तर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शंभू महादेव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


 
Top