भूम / प्रतिनिधी-

मी सावरकर वीर सावरकर, स्वातंत्र्य वीर सावरकरांचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जयघोषात भुम शहरातील सावरकर समर्थक भाजपा कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्त्यानी जोरदार फेरी काढली 

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा अपमानजनक उल्लेख केल्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे या अनुशंगाने भुम भारतीय जनता पार्टी ने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले होते याचे सूत्रसंचालन भाजपाचे शहर अध्यक्ष व गौरव यात्रेचे संयोजक संतोष सुपेकर यांनी केले.

 या यात्रेचा शुभारंभ करताना भाजपा नेते बाळासाहेब क्षीरसागर यांनी महापुरुषांच्या बाबतीत कोणीही बोलताना मर्यादा संभाळण्याची गरज व्यक्त केली, तसेच राहुल गांधी यांना न्यायालयने मोदी आडनावाचा अपमानजनक उल्लेख केल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे तिथे त्यांनी सावरकरांचा उल्लेख करण्याचा संबंध येतो कुठ ? असा प्रश्न केला.  तसेच यानी सावराकरांच्या कामाचे मूल्यमापन कारन्याएवढी राहुल गांधी यांची लायकी नाही सावरकरांच्या अपमानाची परतफेड जनता करेल असे वक्तव्य केले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष महादेव वडेकर यांनीही आपल्या भाषणात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.

या गौरव यात्रेत भाजपा नेते श्री बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस श्री आदम शेख भाजपा ता. अध्यक्ष श्री महादेव वडेकर शिवसेना तालुका प्रमुख श्री बालाजी गुंजाळ भाजप नेते श्री अंगद मुरूमकर शिवसेना नेते श्री विशाल ढगे शिवसेना नेते समाधान सातव ता. सरचिटणीस संतोष सुपेकर मा. नगर सेवक श्री रोहन जाधव शहर अध्यक्ष श्री शंकर खामकर शहर सरचिटणीस श्री हेमंत देशमुख अआज शहर अध्यक्ष श्री प्रदीप साठे श्री सचिन बारगजे श्री चंद्रकांत भगत श्री ऍड श्री संजय शाळू ता. उपाध्यक्ष श्री अमोल बोराडे ता. युवा अध्यक्ष श्री भाऊसाहेब कुटे युवा ता. सरचिटणीस श्री सचिन मस्के युवा ता. सरचिटणीस श्री मुकुंद वाघमारे महिला मोर्च्या ता. अध्यक्ष सौ. लताताई गोरे ता. सोशल मीडिया शांतीराज बोराडे श्री संदीप महानवर कृष्णा पांचगे श्री शंकर घुले श्री सुहास बुरटे श्री सिद्धार्थ जाधव श्री रमेश देशमाने श्री किरण कुलकर्णी श्री उदय कुलकर्णी श्री लक्ष्मण भोरे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top