धाराशिव / प्रतिनिधी-

माजी नगराध्यक्षा स्मृतीशेष रेवती बनसोडे व दिवंगत नगरसेवक माणिक बनसोडे यांच्या स्मरणार्थ  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मृत्युंजय माणिक बनसोडे यांनी अन्नदान दिले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, डॉ प्रतापसिंह पाटील, डॉ अविनाश तांबारे, नंदकुमार गवारे, नितीन बागल, रणवीर इंगळे, कुणाल निंबाळकर, जयंत देशमुख, योगेश सोन्ने-पाटील, शेखर घोडके व पंकज भोसले यांच्या हस्ते भोजनाचे वाटप करण्यात आले. सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे भोजनदान सुरू ठेवण्यात आले. याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला.


 
Top