धाराशिव / प्रतिनिधी-

 येरमाळा ता.कळंब येथे श्री.येडेश्वरी देवी पोर्णिमा उत्सव -2023 साजरा होणार आहे. या यात्रेकरिता मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात दि.6 व 7 एप्रिल 2023 हे दोन दिवशी  देवीजीची पालखी मिरवणूक व इतर धार्मिक कार्यक्रम असल्याने या दोन दिवसात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते या दिवशी यात्रेत काही अनुचित प्रकार घडु नये व शांतता रहावी. या दृष्टीने श्री. येडेश्वरी देवी मंदीर परीसरातील व येरमाळा गावातील सर्व देशी/विदेशी दारू दुकाने व बीअर बार,परमिटरूम दि.6 व 7 एप्रिल 2023  या दोन दिवसी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.


 
Top