धाराशिव / प्रतिनिधी- 

कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव (उस्मानाबाद) पंचवार्षिक निवडणूक  २०२३  च्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री ना. तानाजी सावंत साहेब आणि माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली  व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा- शिवसेना शेतकरी विकास पॅनल जाहीर करण्यात आले.

 भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे झालेल्या बैठकीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी नाईकवाडी यांनी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सर्वानुमते ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली तसेच सदरील उमेदवारांना निवडुन द्यावे असे प्रतिपादन केले.

 भारतीय जनता पार्टी व शिवसेना  शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार खालील प्रमाणे

 सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ-  राजेंद्र बाळासाहेब पाटील, संजय परसराम वाघ, निहाल कलिमोद्दीन काझी, प्रदिप नेताजीराव वीर, दत्तात्रय विनायक देशमुख, अमरसिंह रामराजे पडवळ, संतोष शहाजी पवार,  सेवा सहकारी संस्था महिला- मनिषा अरविंद पाटील, स्वाती अरुण कोळगे, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग (OBC) - गोविंद ज्ञानोबा लगडे, सेवा सहकारी संस्था भ. वि. जा. (VJNT)- शेषेराव हिरामण चव्हाण,  ग्रामपंचायत सर्वसाधारण - अनिल शहाजी भूतेकर, सुधिर बलभीम भोसले,  ग्रामपंचायत अनुसुचित जाती/जमाती SC/ST - सुभाष महादेव पाटोळे,ग्रामपंचायत अर्थिक दष्या दुर्बल घटक - मूराद नन्नू पठाण,  व्यापारी मतदारसंघ-  विपीन त्रिंबक काकडे, बाळकृष्ण दत्तात्रय झाडे

 हमाल मापाडी-  सौदागर अर्जुन चव्हाण

 धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वागीण विकासासाठी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व सर्व घटकांचा विचार करुन पॅनल उभा केले आहे. येणाऱ्या काळात एक चांगली बाजार पेठ नाव लौकीक करण्याच्या अनुशंगाने ही निवडणूक भाजप- शिवसेना युतीच्या वतीने लढवली जाणार आहे. राज्यात असलेल्या भाजपा- शिवसेना युतीचे सरकार आणि त्यांच्या पाठीशी असलेले मतदार यामुळे भाजपा-शिवसेना युतीचे शेतकरी विकास पॅनल विजयी होईल असा आशावाद भाजपा  जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केला. तसेच एक दिलाने पालकमंत्री ना.तानाजी सावंत साहेब व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक लढवली जाणार असून ती बहुमताने जिंकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले. 

 यावेळी जेष्ठनेते सुधाकर गुंड, अँड. नितीन भोसले, सतिष देशमुख, बालाजी गावडे यांच्यासह सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.


 
Top