येडशी/ प्रतिनिधी

 येथील मृदंगाचार्य जालिंदर बप्पा सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित संगीत विद्यालय व वारकरी शिक्षण संस्थेच्या तसेच अखिल भाविक वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोफत शास्त्रीय संगीत, स्वावलंबन व संस्काराचे धडे तसेच वारकरी सांप्रदायिक  प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि 10 मे ते 5 जून 20 23 या कालावधीत करण्यात आले आहे.

या शिबिरात 25 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन त्यांना गुरुकुल पद्धतीने निवासी ठेऊन घेऊन प्रशिक्षण देण्यात येते तरी इच्छुकांनी यासाठी दि १ मे पर्यन्त नोंदणीसाठी मो ९४२०२०११९५. यावर अथवा येडशी येथील संस्थेत प्रत्यक्ष भेटुन नोंद करावी असे अवाहन संस्थेचे सचिव  व भाविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री महादेव जालिंदर सस्ते गुरुजी यांनी केले आहे.


 
Top