धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव शहरात मुबलक पाणीसाठा असून देखील धाराशिव शहराला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. धाराशिव शहरातील नागरिक वेळोवेळी नगरपालिकेला कर भरतात परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये धाराशिव शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. शहरांमध्ये बारा ते पंधरा दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे,तो ही कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो तसेच स्वच्छतेचा पुरता बोजवारा झालेला आहे,शहरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहे.नगरपालिकेची घंटागाडी ही आठ आठ दिवस येत नाही,त्यामुळे शहरांमध्ये जागोजागी सार्वजनिक ठिकाणी कचरा साठत आहे,तसेच शहरांमध्ये घाण कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत आहेत त्या कारणामुळे दुर्गंधी वाढवण्यासाठीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.आता पुढील काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे, शहरांमध्ये तुंबलेल्या नाऱ्या मधून पाणी जमा झाल्याने रोगराई पसरत आहे त्यामुळे शहरांमध्ये नालीचे साफसफाई करणे गरजेचे आहे नगरपालिका प्रशासनाने याकडे पूर्णता दुर्लक्ष केले आहे.

सध्या सर्व धर्मीयांचे सण चालू असून देखील अशा परिस्थितीत नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे, नगरपालिकेच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे,तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती की सदरील शहरातील स्वच्छतेचे व पाण्याबाबतीत होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.

हे निवेदन देताना माजी नगराध्यक्ष प्रदीप साळुंके, न.प. गटनेते सोमनाथ गुरव, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, नगरसेवक राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, तुषार निंबाळकर, उपशहर प्रमुख बंडू आदरकर, विजय ढोणे, सुरेश गवळी, निलेश शिंदे, एच. एम. देवकते, बाळासाहेब दंडनाईक, संकेत सूर्यवंशी, दिनेश बंडगर, अभिराज कदम, अमित उंबरे, सुमित बागल, राज निकम, गुड्डू जेके शेख, बालाजी कवडे, सतीश माळी, नवज्योत शिंगाडे, सुधीर अलकुंटे, विकास धोत्रे, छोटा साजिद, मनोज उंबरे, गणेश साळुंखे, अरबाज शेख, रंजीत माळाळे, चंद्रकांत पांढरे आधी शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top