धाराशिव / प्रतिनिधी- 

धाराशिव तालुक्यातील कोंड येथे एका महिलेने 3 लहान मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना केली आहे.पतीने दारू पिऊन मारहाण केल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले असुन तिच्या पतीची नौकरी गेल्याने ते कुटुंब आर्थिक अडचणीत होते त्या तणावातून पतीला व्यसन जडले आणि दारूच्या आहरी जाऊन या कुटुंबाचा नाश झाला.कोंड गावात दारूबंदी ठराव घेऊनही व वारंवार निवेदन देऊनही अवैध दारूविक्री सुरु होती. जिल्हाधिकारी व प्रशासन जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला आहे.

राणी बबन बनसोडे (वय 40 वर्षे), अनुषका बबन बनसोडे (14 वर्षे ) राजविर बबन बनसोडे (10 वर्षे ) व राजनंदीनी बबन बनसोडे ( वय 7 महिने ) यांनी आत्महत्या केली. काही दिवसापूर्वीच कोंड येथील नागरिकांनी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासंदर्भात पोलिसांना निवेदन दिले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने तेथे छापीमारी केली होती मात्र कोणालाही पकडले नाही.

 
Top