धाराशिव / प्रतिनिधी- 

सम्राट अशोक धम्मचक्र बहुउद्देशीय प्रतिष्ठान धाराशिव  संचलित स्मृतीशेष सौ. लता बाबासाहेब बनसोडे यांच्या स्मरणार्थ "सम्यक ध्यान केंद्राचे" लोकार्पण सोहळा दि. 18/04/2023 रोजी धाराशिव कळंब विधानसभा आमदार कैलास पाटील व प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

    दि. 18/04/2023 रोजी ठिक 11.00 वाजता सम्राट अशोक धम्मचक्र बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य असलेल्या सौ. लता बाबासाहेब बनसोडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त शहरातील जाधववाडी रोड, रविशंकर विद्यालयाच्या पाठीमागे स्वखर्चातून इमारत बांधू बौध्द अनुयायी तसेच सर्व धर्म समुदायातील वयोवृध्द पुरुष व महिला यांना ध्यान धारणा केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी भन्ते प्रज्ञाबोधिजी, भन्ते नागसेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती. महामानव परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भन्ते नागसेनजी व भन्ते प्रज्ञाबोधजी यांच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम घेण्यात आला व सामुहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करुन उपस्थित मान्यवरांनी बुध्द आणि त्यांच्या धम्माबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.   धाराशिव  शहरात एकमेव ध्यान केंद्राचे उद्घाटन करतेवेळी परिसरातील अनेक बौध्द बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच सदरील कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा सरचिटणीस धनंजय वाघमारे, तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य बाबासाहेब बनसोडे, अंकुश उबाळे, विजय बनसोडे, प्रशांत बनसोडे, नितीन कांबळे (पुणे), प्रितम बनसोडे, स्वप्नील बनसोडे, दिपराज बनसोडे, बन्सीलाल कुचेकर, विठ्ठल समुद्रे, शिवाजी सरडे, अशोक बनसोडे, प्रित्यार्थ ओव्हाळ, बाबासाहेब जानराव, उमेश सिरसाठे (सर), संपत शिंदे, गोडसे सर, डॉ. रमेश कांबळे, युवराज जानराव, दादा झेंडे, रावसाहेब मस्के, नाना भेडे, योगेश बनसोडे, राहूल गंगावणे, गोपी बनसोडे, योगेश वाघमारे, राजरत्न ओव्हाळ, आकाश वाघमारे, विकी गायकवाड आदि मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top