परंडा / प्रतिनिधी - 

परंडा शहरात बूथ सशक्तीकरण , स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, सामाजिक न्याय पंधरवाडा, भाजपा स्थापना दिन, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त येथील भाजपा कार्यालयात मंगळवार दि.४ रोजी प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

     यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मा. जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस (सं) नितीन भोसले, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, बालाजी कोरे, ॲड. जहीर चौधरी, ॲड. संदीप शेळके, तानाजी पाटील, सुबोधसिंह ठाकूर ,महावीर तनपुरे,उमेश गोरे, समीर पठाण, तसेच तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top