परंडा / प्रतिनिधी -

भगवान महावीर जन्म कल्याणक उत्सवाच्या निमित्त १४ स्वप्न व महावीरांच्या पाळण्याचे पूजन करण्यात आले. तसेच आरती, स्नात्र पूजा आदी धार्मिक विधी श्री जैन श्वेतांबर मल्लिनाथ मंदीर ट्रस्ट यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तसेच शहरातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. 

  यावेळी अध्यक्ष सुहास शहा, उपाध्यक्ष सुयोग शहा, अजितनाथ भगवान दिगंबर मंदीर ट्रस्ट अध्यक्ष अरविंद शाह, उपाध्यक्ष वैभव शाह यांच्यासह रतिलाल शाह, संदीप शाह, किरण शाह, बिपीन मेहता, अभय देसाई, अमोल देसाई, प्रवीण मुनोत , जवाहरलाल परांडकर, उज्ज्वल बेदमुथा, रमणलाल बेदमुथा, सचिन बेदमुथा, संतोष बेदमुथा, सुरेश कात्रेला, मोहनलाल देसाई, धन्यकुमार मोदी, प्रमोद एखंडे, पांडुरंग कासार,  समाजातील युवक, युवती आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते.


 
Top