धाराशिव   / प्रतिनिधी-

दि. 22 एप्रिल 2023 रोजी वार – शनिवार या दिवशी “ अक्षय तृतिया “ या दिवशी शुभमुहर्तावर देशभरात  मोठया प्रमाणात विवाह आयोजीत होत असतात सदर दिवशी ‘बाल विवाह’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपुर्ण राज्यात लागु आहे. त्यानुसार बाल विवाह करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे .  

           धाराशिव जिल्ह्यात ‘अक्षय तृतीया’  या दिवशी  बाल विवाह होवू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.  बाल विवाह ही प्रथा  बालहक्काच्या विरोधी असुन बाल विवाह प्रतिबंधक अधिनीयम 2006 नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात आणि या विरोधात  गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षीत आहे. तसेच सदर कायदयाच्या अंमलबजावणी संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसुचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणूण घोषीत करण्यात आलेले आहे. 

त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील संबंधीत कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होवू नये यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जिल्हयातील सर्व संरपच / ग्रामसेवक यांना अक्षयतृतीयाच्या दोन दिवस अगोदर बाल विवाह कायदयाने गुन्हा आहे, बाल विवाहाचे आयोजन करणारे वधु-वर यांचे आई वडील, नातेवाईक, विवाह लावणरे, मंडपवाले, आचारी, व-हाडी मंडळी या सर्वावर गुन्हा नोंदविण्यात येईल आशा आशयाची दवंडी आपआपल्या गावात देण्यात यावी असे मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचे निर्देश आहेत.

सरंपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक (बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी), अंगणवाडी सेविका (सहा.बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी) तसेच संबंधीत गावातील शाळेचे शिक्षक यांनी अक्षय तृतीयाच्या दिवशी नेमणुकीच्या गावी/कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे व बाल विवाह होत असल्याचे लक्षात आल्यास प्रतिबंध करावा व नागरीकांनी दक्ष राहुन चाईल्ड लाईन क्रं. 1098 या टोल फ्री क्रमांकावर बाल विवाहा बाबत माहिती दयावी तसेच संबंधीत पोलीस स्टेशनला माहीती देण्यात यावी. अक्षय तृतीया या दिवशी उस्मानाबाद जिल्हयात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा. दुरध्वणी 02472-222592  Email- dwcdosm01@gmail.com


 
Top