धाराशिव   / प्रतिनिधी-

उत्तर प्रदेश राज्यातील लखनउ शहरामध्ये सीमा सशस्त्र बल यांनी 71 वी अखिल भारतीय पोलीस ॲथलेटिक क्लस्टर, खो-खेा स्प्‍र्धा 2023 भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये देशभरातील 32 संघाचा सहभाग होता. खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्र पोलीस महिला संघाची राजस्थान पोलीस संघासोबत लढत झाली. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस महिला संघाने 7-6 अशा गुणांनी विजय मिळवला. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील महिला खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकाविला असुन सदर संघामध्ये धाराशिव पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार ब.नं.1314 संगिता रविंद्र पवार यांचा देखील सहभाग हेाता. महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव लौकिक केल्याबाबत त्यांचा  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे कडुन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले आहे.

 
Top