उमरगा / प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील, नाईचाकूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै.नाभीराज जमालपुरे यांचा नातू डॉक्टर आशिष अजित कुमार जमालपुरे यांनी एमबीबीएस उत्तीर्ण झाल्याने नाईचाकुर व उमरगा परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जळगाव येथील गोदावरी फाउंडेशन संस्था संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएसला शिक्षण पूर्ण झाले .डॉक्टर आशिष यांचे प्राथमिक शिक्षण श्रमजीवी शिक्षण संस्था उमरगा संचलित द रायजिंग सन इंग्लिश स्कूल उमरगा येथून प्राथमिक माध्यमिक परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले होते.अतिशय मेहनत अभ्यास शांत स्वभाव व होतकरू असल्याने सुरुवातीपासूनच डॉक्टर होण्याची जिद्द असल्याने ती पूर्ण केली आहे ,जैन धर्माचे गुरु व त्यांचे आई-वडील अजित जमालपुरे सौ अंजली जमालपुरे दोघेही आदर्श इंग्लिश स्कूलला शिक्षिका असल्याने त्यांच्यावर सातत्याने चांगले संस्कार घातल्याने एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाले आहे. गोदावरी फाउंडेशनचे खासदार उल्हासराव पाटील डॉक्टर केतकीताई पाटील रजिस्ट्रार भीरुड महाविद्यालयाचे डिन डॉ. एन एस आर्वीकर यांनी डॉक्टर आशिष यांचे शाल पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन गौरव केले, त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील विठ्ठल साई कारखान्याचे संचालक केशवराव पवार, किसनराव कांबळे, रामकृष्णपंत खरोसेकर, प्राचार्य दिलीप गरुड, रुक्मिणी पवार, सतीश पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले त्यांच्या या यशाबद्दल पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आले