उमरगा / प्रतिनिधी-
पालिकेचें कर्मचारी शिवशंकर महादेव मोरे यांच्या सेवा निवृत्ती निमित्ताने शुक्रवारी (दि३१) रोजी त्यांचा विविध संस्था, संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यालयीन अधीक्षक तुळशीदास वऱ्हाडे,आमदार ज्ञानराज चौगुले,नळदुर्ग नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा निर्मलाताई गायकवाड यांनी मोरे यांचा सत्कार केला.
त्यानंतर श्रीराम मंगल कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक बाबुराव जाधव, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषचे माजी समाजकल्याण सभापती हरिष डावरे,रिपाई नेते एस.के.कांबळे (चेले)मुख्याध्यापक नागनाथ कांबळे, सुभाष दामशेट्टी,बाबुराव सुरवसे,मदार शेख,गुलाब डोंगरे,नारायण सोनकांबळे, सुभाष मुरमे,सुरेश भोसले,यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या आधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या वेळी जी.एल.कांबळे,मुख्याध्यापक दत्ता कांबळे,जगन्नाथ कांबळे,हरिष डावरे आदींची भाषणे झाली.या वेळी महादेव देवस्थान पंचकमिटी,महात्मा फुले पथसंस्था,दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट,नालंदा मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था,सम्राट सेवाभावी संस्था नळदुर्ग, डॉ.सागर गायकवाड,आदींच्या वतीने मोरे यांचासत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पालिकेचे कर्मचारीअंकुश माने,करबस शिरगुरे, शेषेराव भोसले, विवेक शाहीर आदींनी पुढाकार घेतला होता
कार्यक्रमास माजी नगरसेवक दत्ता रोंगे,बालाजी सुरवसे,विक्रम मस्के,माजी नगरसेविका सविता वाघमारे,प्रा.डॉ. मिलिंद सूर्यवंशी,प्रा.उत्तम कांबळे, चंद्रकांत मजगे,डी.टी. कांबळे, सुभाष काळे,मनोज जाधव,मधुकर यादव,चंद्रकांत कांबळे, मकांवती कांबळे,तुकाराम बिराजदार,आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कांबळे यांनी केले.नितीन मोरे यांनी आभार मानले.