तेर/ प्रतिनिधी-

 प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता. धाराशिव येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री. संत गोरोबा काकांच्या प्रति वर्षीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक पुण्यतिथी सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार तरी सर्व विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेऊन पुण्यतिथी सोहळा सुरळीत पार पाडावा असे आवाहन  धाराशिव येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त तथा श्री संत गोरोबाकाका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी संजय पाईकराव यांनी केले  .

  तेर ता. धाराशिव येथील संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा वार्षिक पुण्यतिथी सोहळा  याही वर्षी दिनांक १५ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा होणार असल्याने त्यानुसार दिनांक २९ मार्च रोजी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने रद्द केलेली नियोजनाची बैठक पुन्हा सोमवार दिनांक ३ एप्रिल रोजी पुण्यतिथी सोहळ्याच्या नियोजनासाठी  संबंधीत विभागाकडून केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजीत केलेल्या बैठकीत पाईकराव बोलत होते .यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे ,  यावेळी सरपंच दिदी काळे , उपसरपंच श्रीमंत फंड , ढोकी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कपिल बुध्देवार  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र चाटे , सार्वजनिक न्यास व नोंदणी विभागाचे निरीक्षक श्रीपाल बनसोडे ,  वैद्यकीय अधीक्षिका डॉ.नागनंदा मगरे , आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत मंदिर ट्रस्ट , ग्रामपंचायत , पंचायत समिती , महावितरण , पाटबंधारे , बांधकाम , आरोग्य विभाग अग्नीशमन ,  मंदिर समिती ,  या विभागाच्या वतीने यात्रेसंबधी केलेल्या तयारीचा आढावा सादर केला . ग्रामपंचायतीच्या  वतीने भाविकांना सर्व मुलभूत सुविधा पुरविल्या जातील सर्वांच्या सहकार्याने हा वार्षिक पुण्यतिथी सोहळा सुरळीतपणे पार पाडला जाईल अशी ग्वाही उपसरपंच श्रीमंत फंड यांनी बैठकीत दिली .

यावेळी या बैठकीस  मंडळ अधिकारी अनिल तिर्थकर , ग्रामविकास अधिकारी  प्रशांत नाईकवाडी , बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर , पोलिस पाटील फातेमा शेख,ह.भ.प.महादेव महाराज तांबे , तलाठी प्रशांत देशमुख ,  मंदिर समितीचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर , सुधाकर बुकन, अजित कदम , अविनाश आगाशे , नवनाथ पसारे , बापू नाईकवाडी ,  नामदेव कांबळे , धनंजय आंधळे , संजय लोमटे , जुनेद मोमीन , विलास रसाळ,बाशीद काझी , भारत नाईकवाडी , तानाजी पिंपळे , अमोल थोडसरे , संगिता डोलारे, कविता आंधळे ,  दैवशाला भोरे , राणी शिराळ , मिरा गाढवे , रेश्मा नानजकर  आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .


 
Top