धाराशिव / प्रतिनिधी-

 अनेक महिन्यांपासून प्रलंबित बाजार समिती निवडणुकीचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठही बाजार समितीच्या प्रत्येकी १८ जागांसाठी सोमवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ६८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच पाच दिवसात १४४ जागांसाठी एक हजार ६२ जणांनी उमेदवारी दाखल केली. ५ एप्रिल रोजी बुधवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारांना अर्ज परत घेण्यासाठी ६ एप्रिलची डेडलाइन दिली आहे.

 २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदावारांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी दाखल केली. चार मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज सहकारी संस्था मतदारसंघातून दाखल झाले. सर्वात कमी हमाल मापारी मतदारसंघातून ३९ अर्ज दाखल झाले. तसेच सर्वात कमी अर्ज मुख्म बाजार समितीत दाखल झाले आहेत.

सेवा सहकारी संस्था मतदारसंघात अधिक उमेदवार

बाजार समितीच्या विविध चार मतदारसंघापैकी सर्वाधिक ११   उमेदवार हे सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून निवडण्यात येणार आहे. यातही सर्वसाधारण, महिला, इतर मागासवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती असणार आहे.ग्रामपंचायत मतदारसंघातून चार उमेदवार असून यात सर्वसाधारण, अनुसूचित जाती, जमाती, आर्थिक दृष्टया दुर्बल घटक यात सहभागी असणार आहे. व्यापारी संघातून दोन तर हमाल मापारी मतदारसंघातून एक उमेदवार असणार आहे.


 
Top