परंडा येथील मौजे सोनारी  येथील काळभैरवनाथ यात्रेनिमित्त दि.18 एप्रिल 2023 रथ मिरवणूक व इतर कार्यक्रम असल्याने या दिवशी काही प्रकार घडू नये व शांतता राहावी या दृष्टीने काळभैरवनाथ मंदिर परिसरातील व सोनारी गावातील सर्व देशी विदेशी दारु दुकाने व बिअरबार,परमिट रुम,बिअर शॉपी दि.18 एप्रिल 2023 रोजी विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.मौजे तेर येथे दि.15एप्रिल 2023 ते 24 एप्रिल 2023 या कालावधीत संत गोरोबा काकांचा समाधी सोहळा तथा पुण्यतिथी यात्रा महोत्सव साजरा होणार आहे.दि.16 एप्रिल 2023 रोजी एकादशी व इतर धार्मिक कार्यक्रम असल्याने तसेच दि. 18 एप्रिल 2023 रोजी श्री.संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी कार्यक्रम असल्याने आणि या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये व शांतता राहावी या दृष्टीने श्री गोरोबा काका मंदिर परिसरातील व तेर गावातील सर्व देशी विदेशी दारु दुकाने व बिअरबार,परमीट रुम,बिअर शॉपी दि.16 आणि 18  एप्रिल 2023 या दोन  दिवशी विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदयातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

 
Top