धाराशिव / प्रतिनिधी-

 मोटार वाहन कर जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूली योग्य्‍ असलेल्या रक्कमेच्या मागणी येणे असलेल्या रक्कमेच्या वसूलीसाठी खाली निर्दीष्ट केलेली जंगम मालमत्ता अटकावून करुन ठेवण्यात आलेल्या आहेत.

 जंगम मालमतेच्या कराची थकबाकी दि. 17 मे 2023 पुर्वी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे देण्यात यावी अन्यथा अटकावुन ठेवलेली वाहने ई- लिलाव पध्दतीने विकण्यात येतील. लिलावाच्या दिनांकानंतर थकबाकीदारास वाहनाचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकार राहणार नाही. अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधिन राहील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार  यांनी केले आहे.

 अटकावुन असलेल्या व वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनाची लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येईल.  ई लिलाव ऑनलाईन किंवा ऑफलाईन कागदपत्रे दि.15 मे रोजी सकाळी 11.00 पासून  ते  16 मे 2023 रोजीच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत नोंदणी करावी. प्राप्त झालेल्या कागदपत्रांची पडताळणी व मंजूरी दि. 16 मे रोजीच्या  सायंकाळी 5 पासून दि18 मे 2023 रोजीच्या सकाळी 10 पर्यंत करण्यात येणार आहे. बोलीदारांना वाहने पाहणी करिता दि.15 मे  रोजी सकाळी 11 पासून ते दि.18 मे 2023 रोजीच्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत. लिलावाची तारीख दि.19 मे 2023 सकाळी 11 ते दुपारी 4 आहे. लिलावा बाबत अटी व शर्ती व वाहनांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध्‍ करण्यात येईल. 

 
Top