जळकोट/ प्रतिनिधी-

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायतीची छत्रपती संभाजी नगर विभागातून तृतीय क्रमांक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम विभागस्तरीय तपासणीत तालुक्यातील स्मार्ट ग्राम आलियाबाद या ग्रामपंचायतीची विभागातून तृतीय क्रमांक साठी निवड करण्यात आली आहे.

या अगोदरही आलियाबाद ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय संभाजी नगर येथे होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, आनंत कुंभार ,जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचे अभिनंदन केले आहे .


 
Top