तुळजापूर/ प्रतिनिधी- 

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी  मातेस  अक्षय तृतीया दिनानिमित्ताने  शनिवार दि.२२रोजी  शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.

 अक्षय तृतीया निमीत्ताने आई जगदंबा मातेस शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले.  शनिवारी आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती ञिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासनी जगदंबा मातेचे आजचे मोहक रुप पाहुन देविदर्शनानंतर भाविक धन्य धन्य होत होता 

. आज आई जगदंबा माते समोर आंबा व विविध फळांची आरास (सजावट) करण्यात आली होती.

 
Top