धाराशिव / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष, छत्रपती सेना व मल्हार आर्मी संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.१७ एप्रिल रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती ३१ मे रोजी देशभरातील वाड्या, वत्यांपासून ते शहरापर्यंत जयंती साजरी करण्यात येते.  शासनाच्यावतीने महापुरुषांच्या जयंतीला शासकीय सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत. समाजातील अनेक घटकांना जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. महापुरुषांच्या त्यांनी केलेल्या त्यागाचा व त्यांच्या विचारांचा सन्मान करतात. त्यामुळे ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. यावर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके, छत्रपती सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बंडगर,  मल्हार आर्मीचे जिल्हाध्यक्ष बालाजी वगरे, मल्हार आर्मीचे कार्याध्यक्ष विठ्ठल खटके, उपाध्यक्ष समाधान पडुळकर, तालुकाध्यक्ष अशोक गाडेकर, मराठवाडा अध्यक्ष अण्णा बंडगर, कळंब तालुकाध्यक्ष हरिभाऊ शिंपले, संतोषकुमार वतने, सुमित पालवे, राजेश मेटकरी, बालाजी चौरे, आश्रुबा कोळेकर, त्रिशाला थरसे, श्रीकांत तेरकर, सचिन देवकते, महादेव घोडके, राजेंद्र अडसुळे, अजित माळी आदींसह इतरांच्या सह्या आहेत.


 
Top