धाराशिव / प्रतिनिधी-

सामाजिक न्याय पर्व अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,उस्मानाबाद यांच्या मार्फत महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कुल उस्मानाबाद येथे  विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,उस्मानाबाद या कार्यालयामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या .

 या स्पर्धेत प्रथम,दिृतीय,तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना,पालकांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत,उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे बलभीम शिंदे, यांनी मार्गदर्शन केले

 
Top